अल्मेडा रस्त्यावर आज सकाळी एका रिक्षाला अचानक लागलेल्या आगीत रिक्षा जळून खाक

ठाण्यातील अल्मेडा रस्त्यावर आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास एका रिक्षाला अचानक आग लागली होती. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ही रिक्षा रायसाहेब सिंग यांची असून १२ वर्ष जुनी आहे. या रिक्षाला आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाही. या आगीत ही रिक्षा जळून खाक झाली. ही रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी असतानाच अचानक या रिक्षाला आग लागली.

Leave a Comment

%d bloggers like this: