अभिव्यक्ती आणि सोशल मिडीयावर ठाण्यात एका परिसंवादाचं आयोजन

अभिव्यक्ती आणि सोशल मिडीयावर येत्या शुक्रवारी ठाण्यात एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय येथे दुपारी साडेचार वाजता हा परिसंवाद होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय मं.गो. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडतील. संविधान दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेनं या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. या चर्चेत पत्रकार किरण सोनावणे, कैलास म्हापदी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद धुमाळे, कोरो संघटनेच्या मुमताज शेख आणि संगीतकार आशुतोष मालती विद्याधर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासंदर्भात केलेल्या भाषणाचं अभिवाचन प्रा. वृषाली विनायक, जितेंद्र लाड, दीपा ठाणेकर, प्रफुल्ल केदारे आणि विशाल राजगुरू करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन झिम्माड काव्यसमूहाच्या वतीनं प्रा. वृषाली विनायक यांनी केलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: