ठाणे मतदाता जागरण अभियान आयोजित नागरिकांच्या अभिरूप महासभेत महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांच्या आयुक्तांच्या बदलीचा आणि चौकशीचा प्रस्ताव स्वीकारला असता आयुक्तांनी निषेध म्हणून सभात्याग केला. शहरातील समस्या जनतेसमोर मांडण्याकरिता या अभिरूप महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जनतेलाही आपल्या समस्या मांडण्याकरिता ही महासभा खुली होती. या महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा आणि त्यांच्या सुमारे ४ वर्षाच्या कारभाराची चौकशी करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सभागृह नेत्यांनी भरपूर विरोध केला. त्यानंतर आयुक्तांनीही आपली बाजू मांडली. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी आणि काही नागरिकांनी प्रस्तावाला विरोध केला. तसंच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आणि अनेक नागरिकांनी या प्रस्तावाचे समर्थन केलं त्यानंतर महापौरांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यावेळी निषेध म्हणून आयुक्त सभात्याग करून निघून गेले. या अभिरूप सभेत ठाण्यातील विविध समस्या तसंच विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.
