अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश

महापालिकेची परवानगी न घेता दिवाळीमध्ये अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दिवाळीमध्ये शहरात अनधिकृत होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबरोबरच अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. अतिक्रमण निष्कासन शुल्क वसुली करण्याबाबत कोणतीही हयगय करू नये, ज्यांची घरं आणि व्यावसायिक आस्थापना तोडल्या असतील त्यांची यादी तपासून त्यांच्याकडून किती निष्कासन शुल्क वसूल करायचं याबाबत धोरण ठरवण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. याबाबत मालमत्ता विकास विभागाकडून करण्यात आलेले बायोमेट्रीक्स तसंच स्थावर मालमत्ता विभागाकडून रेंटल हौसिंगमध्ये घर देण्यात आलेल्या लोकांची यादी तपासून खातरजमा करावी. ही यादी कोणत्याही परिस्थितीत एक आठवड्यात तयार करावी आणि त्यानंतरच वसुलीची कार्यवाही करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading