अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्टरन्स एक्झाम फॉर डिझाईन या परीक्षेत ठाण्याचा विश्वप्रसन्न हरिहरन् देशात प्रथम

अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्टरन्स एक्झाम फॉर डिझाईन या परीक्षेत ठाण्याचा विश्वप्रसन्न हरिहरन् हा विद्यार्थी देशात प्रथम आला आहे. मुंबईच्या आयआयटीनं या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून विश्वप्रसन्न हरिहरननं २१३ गुण मिळवले आहेत. या परीक्षेस देशभरातून १२ हजार ४१४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ९३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये ठाण्याच्या हरिहरननं प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: