ठाण्यातील एक प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक मुकुंद नातू यांचं निधन

ठाण्यातील एक प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक मुकुंद नातू यांचं काल निधन झालं. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७६ वर्षांचे
होते. सचोटीचे बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ठाण्यात ओळख होती. सुरूवातीला
त्यांनी ठाणे पूर्वला इमारती बांधून आपला व्यवसाय सुरू केला. त्या काळी शासकीय
योजनेतून कर्ज उपलब्ध करून त्यांनी अनेक मध्यमवर्गीयांना घरं उपलब्ध करून दिली.
नातू-परांजपेंचं बांधकाम म्हणजे सर्व अधिकृत असा ग्राहकांचा विश्वास होता. सहा हजाराहून
अधिक ग्राहकांना त्यांनी घरं दिली होती. भारत सहकारी बँकेत संचालक म्हणूनही त्यांनी काम
केलं. अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. आज त्यांच्यावर शोकाकुल
वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना
श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या मागे पुत्र, सूना, नातवंडं असा परिवार आहे. ठाणे वार्ता
परिवारातर्फे मुकुंद नातू यांना विनम्र आदरांजली.

Leave a Comment

%d bloggers like this: