ठाणे पूर्वतील अष्टविनायक चौकात भव्य दीपोत्सव

ठाणे पूर्वतील अष्टविनायक चौकात काल भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाडव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. श्री साई दहीकाला उत्सव मंडळातर्फे दरवर्षी असा दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवाचं हे 19वं वर्ष आहे. मीठबंदर रस्त्यावरील अष्टविनायक चौकात अवनीचा म्रुत्यु, देशभक्ती, पाणी वाचवा, शेतकरी आत्महत्या,भुकबळी अशा विषयांवर नयनरम्य रांगोळ्या चितारून त्यावर पणत्या लावण्यात आल्या होत्या. तसंच आवाज विरहित फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. याबरोबरच आकाशात कंदिलही सोडण्यात आले. नातू परांजपे कॉलनी ते अष्टविनायक चौक या परिसरात ३00 कलाकारांनी सुमारे 55 रांगोळ्या चितारल्या होत्या. निसर्गचित्र, संस्कारभारती, कार्टून, देवीदेवता अशा विविध विषयांवरही रांगोळ्या चितारण्यात आल्या होत्या. या रांगोळ्याभोवती सुमारे तीन हजारहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. रात्री या परिसरातील संपूर्ण दिवे मालवून अंधार करण्यात आला आणि हे दिवे परिसरातील नागरिकांनी प्रज्वलित केले. संपूर्ण अंधारात हे दिवे नयनरम्य दिसत होते. विभागातील सर्व जातीधर्म तसंच गरीब-श्रीमंत अशा सर्व थरातील लोकांना दिवाळी साजरी करता यावी या उद्देशानं या दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं.

Leave a Comment

%d bloggers like this: