कल्याण डोंबिवली शहरात गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर

कल्याण डोंबिवली शहरातही कोरोणाचे रुग्ण वाढत आहे . या रुग्णांमध्ये भविष्यात वाढ होऊ नये म्हणून पालिका स्तरावर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत . याचाच एक भाग म्हणून आता पालिका क्षेत्रातील गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार असून गर्दी करणारांचे फोटोही या माध्यमातून घेतले जाणार आहेत, हे फोटो पोलिसांकडे पुढील कारवाई साठी सुपूर्त केले जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांनी सांगितले . स्मार्ट कल्याण -डोबिवली विकास महामंडळाने २ ड्रोन कॅमेरे खरेदी केले आहेत . या २ ड्रोन कॅमेऱ्याची नजर पालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रातील गर्दीच्या ठिकाणावर असणार आहे .ड्रोन कॅमेरा गर्दीच्या ठिकाणावर घिरट्या घालुन गर्दीचे चित्रीकरण करून फोटोही काढणार आहे .पालिकेने १० प्रभाग क्षेत्रातील गर्दीची ठिकाणे निश्चित केली आहेत . या ठिकाणावरुन टिपलेली दृष्ये पोलिसांकडे दिली जाणार असून या आधारे पोलिस पुढील कारवाई करणार आहेत. हा ड्रोन कॅमेरा आपल्या मोहीमेवर गेल्यानंतर कॅमेऱ्यातून प्राप्त होणाऱ्या थेट दृष्यांचे निरीक्षण पालिका कार्यालयाबरोबरच सहाय्यक पोलिस आयुक्त परिमंडळ ३ यांच्या कार्यालयातही होणार असल्याने गर्दीच्या ठीकाणच्या नागरीकांवर त्वरीत आणि जलदगतीने पोलिस कारवाई होणार असल्याने आता नागरीकांनी कोठेही गर्दी करू नये आणि सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पालिका आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांनी केल आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading