अन्न आणि औषध प्रशासनानं घातलेल्या छाप्यात २६ लाखांचा तेलाचा साठा जप्त

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार जनतेच्या सेवनास सणासुदीच्या दिवसात सुरक्षित आणि सकस निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं काल एन एम ऑईलवर छापा टाकून २६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त देशमुख यांच्या निर्देशानुसार काल एन एम ऑईलच्या पिंपरी येथील गोदामावर छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये २१ लाखांचे सुमारे ३० हजार किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल, १ लाखांचे दीड हजार किलो रिफाईन्ड पामोलिन तेल, ४ लाखांचे २ हजार किलो खोबरेल तेल जप्त करण्यात आलं. अन्न आणि औषध प्रशासनानं तेलाचे नमुने विश्लेषणासाठी पाठवले आहेत. हा माल कमी दर्जाचा, योग्य प्रयोगशाळा तसंच तांत्रिक माणसांची कमतरता आणि खाद्यतेल पॅक करण्यासाठी योग्य दर्जाचे डबे न वापरणे अशा विविध कारणासाठी हा छापा टाकण्यात आला होता. जनहित आणि जनआरोग्य लक्षात घेता हा व्यवसाय पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व खाद्यतेल उत्पादकांनी उत्पादित करत असलेल्या तेलांची सर्वांगीण आणि सर्वंकष तपासणी करण्याच्या अनुषंगाने सुसज्ज प्रयोगशाळा उभारावी, उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करावी, खाद्यतेलाच्या पँकींगसाठी डब्यांचा पुनर्वापर करू नये असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केलं असून यांचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading