देशात सुरक्षित वाहन चालवण्याची संस्कृती रूजवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूनं होंडा मोटरसायकल ॲण्ड स्कूटर इंडियानं ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा जागृती अभियानाचं आयोजन केलं होतं. हे अभियान ठाण्यातील एसव्हीएसएस ट्री हाऊस हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. ४ दिवसांच्या या उपक्रमामध्ये १७०० हून अधिक जणांना रस्ता सुरक्षेविषयी जागृत करण्यात आलं. प्रत्येकाची सुरक्षितता या उद्देशांतर्गत १६०० हून अधिक बालकं आणि दीडशे प्रौढ सहभागी झाले होते. लहान मुलांना रस्ता विषयक सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी नवे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान सुरू करण्यात आलं आहे. या उपक्रमाद्वारे विविध शहरातील १० शाळांमधील १५ हजाराहून अधिक मुलांपर्यंत पोहचण्याचं होंडाचं उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत १७ हजार मुलं आणि ५ हजाराहून अधिक प्रौढांना जागृत करण्यात आलं. बालकांनी संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षेचे दूत बनावं हा यामागचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
