समूह विकास योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीत आपली नाव आहेत की नाही आणि हरकत, सूचना करण्यासाठी देण्यात आलेला 30 दिवसांचा कालावधी कमी असून यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळावा अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियान केली आहे. ठाणे महापालिकेनं कोपरी, राबोडी, हजुरी, लोकमान्य नगर, टेकडी बंगला आणि किसन नगर या विभागांची एक प्रारूप या यादी जाहीर केली आहे. या प्रारूप यादीमध्ये आपली नाव आहेत की नाही याबाबत संबंधित प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करायचे आहे. त्याबरोबरच निवासाचे पुरावे जोडण्याचा अवाहन करण्यात आल आहे. अर्ज आणि हरकती तसेच सूचना देण्यासाठी 30 दिवसांची कालावधी देण्यात आला आहे, मात्र ही मुदत किमान तीन महिन्यात पर्यंत वाढवावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने उच्चाधिकार समितीकडे केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर या याद्या अपलोड कराव्यात, सर्व प्रमुख वर्तमानपत्रात या याद्या प्रकाशित कराव्यात, प्रभाग समिती कार्यालयांमध्ये त्याच्या प्रती उपलब्ध कराव्यात, अशा मागण्यां बरोबरच, आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेले असल्यामुळे हा कालावधी वाढवणे गरजेचे असल्याचे अभियानानं म्हटले आहे.
