सुहास जोशी म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ – अशोक समेळ

सुहास जोशी म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ आहेत असे उद्गार जेष्ठ अभिनेते दिगदर्शक अशोक समेळ यांनी ठाण्यात बोलताना काढले. ब्ल्यू एंटरटेंनमेंट आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यमाने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ४थ्या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये जेष्ठ अभिनेत्री श्रीमती सुहास जोशी यांचा चित्ररत्न पुरस्कार देऊन गौरव केला त्यावेळी ते बोलत होते. सुहास जोशी यावेळी भावुक झाल्या होत्या. आपल्याला हे मानपत्र घेताना भरून आले. आमच्या वेळी एकपात्री स्पर्धा, लघुपट किंवा इतर माध्यमे कमी होती. नवीन मुलांना अनेक साधने उपलब्ध आहेत असे मत सुहास जोशी यांनी व्यक्त केले. जेष्ठ अभिनेते अशोक समेळ यांनी सुहास जोशी विषयी सांगितले की ‘सुहास जोशी या अभिनयाचे विद्यापीठ आहेत. नवीन येणाऱ्या कलाकारांना यांच्याकडून खुप शिकत येईल. बालकलाकार मैथिली पटवर्धनला रायसिंग स्टार म्हणून गौरवण्यात आले. या महोत्सवात नागपूर, पुणे, सातारा, नाशिक अहमदनगर यासारख्या विविध शहरातूनच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरील मद्रास, केरळ, दिल्ली यासारख्या राज्यातून सुमारे १५० शॉटर्फिल्म सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ‘प्रॉन्स’ या लघुपटाला परीक्षकांनी तसचे १५ ऑगस्ट या लघुपटाला उत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक मिळाले. स्वप्नील शेट्ये, अनिलकुमार साळवी यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये ५३ स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये १५ वर्षावरील गटात अंकिता वेलणकर प्रथम, पूजा कांबळे- द्वितीय, कल्याणी भागवले-तृतीय तसेच १५ वर्षाखालील गटात आकाश ठोंबरे- प्रथम, प्रज्ञा साबळे व्दितीय, सिद्धी भांबोरे तृतीय यांना पारितोषिक मिळाले. ब्लू एंटरटेनमेंट आणि साई इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय कार्यशाळा फिल्मीकट्टा सुरू करणार आहे त्यानिमित्ताने आरंभ या वेबसिरीजचे पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

 

Leave a Comment

%d bloggers like this: