सिंचन भवनातील शासकीय जीप चोरून नेणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या हवाली

सिंचन भवनातील शासकीय जीप चोरून नेणाऱ्या तरुणाला सिंचन भवनातील सुरक्षारक्षक आणि जीपचालकाने कोपरी पोलिसांच्या हवाली केले.विकास बांगर असे चोरट्याचे नाव आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास सिंचन भवन आवारात घडला. शासनाच्या खारभूमी विकास विभागाच्या जीप गाडीवर चालक असलेले बाबुराव धुळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार,शुक्रवारी कर्तव्य बजावून धुळे हे चालक रात्री कोपरीतील सिंचन भवन येथेच गाडी पार्क करून वाहन चालक कक्षात आराम करीत होते.तेव्हा,शनिवारी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक सुरक्षारक्षकाला सिंचन भवनातील जीप कुणीतरी चोरून नेत असल्याचे दिसले.त्यानुसार,त्यांनी चोर..चोर असे ओरडण्यास सुरुवात केली.हा आवाज ऐकून चालक धुळे यांनी सुरक्षारक्षकाच्या सोबतीने धाव घेत विकास या चोरट्याला पकडले.चोरट्याने, ही गाडी या गाडीवर चालक असलेल्या आपल्या वडिलांनी आणावयास सांगितल्याची बतावणी केली.तरीही,धुळे आणि सुरक्षारक्षकाने त्याला पकडून ठेवल्याने गाडी घेऊन पळताना आवारातील दुसऱ्या वाहनाला धडक बसली.तरीही,या चोरट्याला पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading