सरस्वती मंदिर ट्रस्ट नौपाडा येथील इंग्रजी माध्यमाच्या प्री-प्रायमरी विभागांमध्ये विविध कला हस्तकला विज्ञान प्रयोग शैक्षणिक साधने आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाचं आयोजन

ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट नौपाडा येथील इंग्रजी माध्यमाच्या प्री-प्रायमरी विभागांमध्ये विविध कला हस्तकला विज्ञान प्रयोग शैक्षणिक साधने आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिनियर केजी च्या विज्ञान प्रयोग करणाऱ्या यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये तीन ते पाच वयोगटातील प्री-प्रायमरी च्या मुलांचे कलाविष्कार प्रदर्शित करण्यात आले होते. चित्रकलेच्या माध्यमातून मुक्त चित्र, भाषा, गणित, सामान्य ज्ञानाच्या संकल्पना मुलांच्या चित्रातून स्पष्ट होताना दिसल्या. दोन अक्षरातून तयार होणाऱ्या शब्दांची चित्र, हस्तकलेच्या घरी काम चिकन माती पासून बनवलेल्या विविध वस्तू या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. दैनंदिन जीवनात उपलब्ध होणाऱ्या साधनांचा उपयोग करून गमतीदार प्रयोगांना प्रयोगाद्वारे मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा अनोखा प्रयोग या प्रदर्शनातून करण्यात आला होता. चुंबकाचा वापर करून फिष पोंड, हवेच्या दाबाचा उपयोग करून साध्या बाटलीमध्ये शॉवर, असे प्रयोग या प्रदर्शनात सादर करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पालक अनेक शाळा प्रेम ग्रुपचा शिक्षकांनी भेट दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading