सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत अपाहार करणा-या अवनी घाडी या महिला लिपिकाविरूध्द गुन्हा

ठाण्यातील पाचपाखाडी येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील ६१ विद्यार्थ्यांच्या शुल्काचा अपाहार करणा-या अवनी घाडी या महिला लिपिकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अवनी घाडी ही महिला सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत लिपिक म्हणून काम करत होती. तिच्याकडे विद्यार्थ्यांचं शुल्क जमा करण्याची जबाबदारी होती. हे शुल्क जमा करताना ती पालकांना शुल्क जमा केल्याची पावती देत होती मात्र त्याची संगणकातील नोंद ती काढून टाकत असे. काही जणांनी शुल्क जमा न केल्याचं शाळा प्रशासनाच्या लक्षात आलं. त्यावेळी पालकांकडे चौकशी सुरू करण्यात आली. तेव्हा या पालकांनी शाळेकडे शुल्क भरल्याच्या पावत्या सादर केल्या. तेव्हा शाळेच्या हा प्रकार लक्षात आला. अवनी घाडेनं ६१ विद्यार्थ्यांचे सुमारे ६ लाख रूपये शाळेच्या बँक खात्यात जमा न करता त्याचा अपाहार केल्याचं चौकशीत उघड झालं. गेल्या जानेवारी ते डिसेंबर या काळात हा प्रकार सुरू होता. शाळेनं तिच्यावर कारवाई करत तिला शाळेतून काढून टाकलं असून तिच्याविरूध्द पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: