समूह विकास योजनेसाठी सर्वे करणा-यांना रहिवाशांनी लावले पिटाळून

समूह विकास योजनेअंतर्गत बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरता आलेल्या महापालिकेच्या पथकास स्थानिक रहिवाशांनी पिटाळून लावल्याचं वृत्त आहे. ठाणे महापालिकेतर्फे समूह विकास योजना राबवली जात असून यामध्ये सुरूवातीला ६ सेक्टर्स मध्ये योजनेची सुरूवात केली जाणार आहे. यासाठी या ६ सेक्टर्स मध्ये बायोमेट्रीक सर्वेक्षण होणार आहे. समूह विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होऊ नये याकरिता हे बायोमेट्रीक सर्वेक्षण केलं जात आहे. सद्यस्थितीत असलेल्या बांधकामांची अचूक माहिती मिळावी यासाठी पालिका प्रायोगिक तत्वावर जीआयएस प्रणाली आणि लेझर तंत्रज्ञानही वापरणार आहे. हजुरीमध्ये आज पालिकेचे पथक समूह विकास योजनेअंतर्गत सर्वेक्षणासाठी गेले असता रहिवाशांनी या पथकाला पिटाळून लावल्याचं वृत्त आहे. हजुरीमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत सर्वेक्षण केलं जात होतं त्यावेळी हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

%d bloggers like this: