उन्हाळ्यामध्ये भासणार्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका विविध गृहसंकुलात मधून वापरल्या जात असलेल्या पाण्यावर काही बंधन आणण्याची शक्यता आहे. यंदा अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाला त्यातच शेवटच्या महिन्यात पावसान दडी मारल्यामुळे एप्रिल-मेमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. बारवी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा अधिक कोटा उचलल्यामुळे सध्या पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासन पाणी वापरावर बंधन आणण्याची शक्यता आहे. साधारणपणे प्रत्येक घराला 130 ते 140 लिटर पाणीपुरवठा रोज मिळणे आवश्यक आहे. मात्र ठाण्यात अनेक घरांमध्ये यापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा मध्ये विषमता असल्यामुळे अनेक घरात टंचाई तर काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. काही गृहसंकुलात मध्ये महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठाचा वापर हा झाडांसाठी तसेच गाड्या धुण्यासाठी केला जातो.. पालिका यावर बंधन आणण्याची शक्यता आहे. पाण्यावर बंधन आणण्यासाठी व्यापारी तत्वांवर होणार होणारा पाणीपुरवठा नियंत्रित करण्याबरोबरच पाण्याची गळती थांबवण्यासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत. शहरातील अनेक विहरी यासाठी स्वच्छही केल्या जाणार आहेत.
