श्रेयस इथापे याने स्केटिंग या क्रीडा प्रकारात अभूतपूर्व यश

ज्युनिअर के.जी मध्ये शिकणाऱ्या श्रेयस इथापे याने स्केटिंग या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकांची लयलूट करून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात झालेल्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, आणि, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा, क्रीडा महोत्सवात सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, या शाळेतील श्रेयस इथापे याने स्केटिंग या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकांची लयलूट करून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. कुमार श्रेयस याला जिल्हास्तरीय पातळीवर लांब आणि कमी पल्ल्याच्या स्पर्देह मध्ये २ सुवर्ण पदके, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय पातळीवर २ सुवर्ण पदके, बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर २ सुवर्ण पदके, शिवाय विविध स्थानिक स्पर्धा मध्ये रौप्य आणि कास्य पदके मिळाली आहेत.कुमार श्रेयस याचे आणि त्याच्या पालकांचे सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सर्व विश्वस्त मंडळाने हार्दिक अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.श्रेयस चा आम्हाला खूप खूप अभिमान आहे असे मनोगत त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा देशपांडे यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading