श्रीगजानन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मोहन हळबे यांना मातृशोक झाला आहे. मोहन हळबे यांच्या मातोश्री मालती हळबे यांचं अलिकडेच अल्पशा आजारानं निधन झालं. अगदी अखरेचे काही महिने सोडता मालती हळबे या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. ठाण्यातील श्री गजानन मंडळ ट्रस्टची स्थापना त्यांचे पती सदाशिव हळबे यांनी ४० वर्षापूर्वी केली होती. गजानन मंडळ ट्रस्टच्या स्थापनेत मालती हळबे यांचाही मोठा वाटा होता. सुरूवातीस ब्राह्मण सोसायटीतून कार्य करणारं श्रीगजानन मंडळ ट्रस्ट आता शिवाईनगरमध्ये गेलं आहे. ट्रस्टतर्फे श्री गजानन महाराज मंदिर उभारण्यात आलं असून या मंदिरात अनेकदा धार्मिक आणि सामाजिक कार्य केली जातात. अलिकडेच ट्रस्टतर्फे शेगावला आख्खी रेल्वे गाडी नेण्यात आली होती. ट्रस्टच्या सर्व उपक्रमात मालती हळबे या अग्रणी असत. साधारणत: दोन महिन्यापूर्वी घरातच त्या पडल्यानं त्यांच्या मणक्याला इजा झाली होती. त्यांच्या मागे पुत्र मोहन, कन्या, सून, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे.
