शेतक-यांच्या खात्यावर वार्षिक ६ हजार रूपये जमा करणा-या योजनेची जिल्ह्यात काटेकोर आणि कालबध्द अंमलबजावणी करण्याचे आदेश

शेतक-यांच्या खात्यावर वार्षिक ६ हजार रूपये जमा करणा-या योजनेची जिल्ह्यात काटेकोर आणि कालबध्द अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. अल्प, अत्यल्प भूधारक शेतक-यांना प्रतिवर्ष ६ हजार रूपये आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी तात्काळ आणि काटेकोरपणे करावी यासाठी तालुका पातळीवर कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांची प्रशिक्षणं घेऊन जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना याचा लाभ मिळेल हे पाहण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. कालबध्द पध्दतीने या योजनेची अंमलबजावणी करावी, तक्रारीचे निराकरणही व्यवस्थित व्हावं, ग्रामस्तरीय समिती पात्र कुटुंबाची निश्चिती करून त्याची नोंद घेईल. यामध्ये शेतक-यांची आधार, बँक खातं, मोबाईल अशी नोंद घेण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading