शीळफाटा येथील प्लास्टीक गोदामांना आग

शीळफाटा येथे एक मोठी आग लागली होती. शीळफाटा येथील सागर हॉटेल जवळील आशर गल्लीत असलेल्या दुकानांना ही मोठी आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी पालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथकानं धाव घेतली. या गल्लीत प्लास्टीकची गोदामं असून या गोदामांना ही आग लागल्याचं सांगितलं जातं. ही आग नक्की कशामुळं लागली हे समजू शकलं नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब, दोन वॉटर टँकर आणि रेस्क्यू व्हेईकल ही आग विझवण्याचं काम करत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: