शिवाजी पार्क येथील संचलनात ठाण्यातील जाहिरात संस्थेच्या पर्यावरण विषयक चित्ररथास प्रथम क्रमांक

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील जाहिरात संस्थेच्या पर्यावरण विषयक चित्ररथास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. यावर्षी राज्यातील विविध १४ विभाग या संचलनात सहभागी झाले होते. शासनाच्या ऐतिहासिक अशा प्लास्टीक बंदी निर्णयाला अनुसरून पर्यावरण विभागाचा प्लास्टीक बंदी हा चित्ररथ पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. ठाण्यातील न्यू एज मिडीया या जाहिरात संस्थेनं हा चित्ररथ बनवला होता. प्लास्टीकनं निसर्गाला कसा विळखा घातला आहे हे दाखवण्याकरिता समुद्रामध्ये कालिया नाग देखील प्लास्टीकमय झाला आहे आणि त्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाऐवजी हरित सैनिक दाखवण्यात आले होते. चित्ररथाच्या समोरील बाजूस महाकाय कापडी पिशवी ठेवण्यात आली होती. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एकाच वर्षी ४ चित्ररथ बनवण्याचा विक्रम या जाहिरात संस्थेनं केला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: