शिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दतीनंही धान्य पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी

शिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दतीनंही धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसनं केली आहे. शासनातर्फे शिधावाटप विभागाचे संगणकीकरण केलं जात आहे. जिल्ह्यामध्ये ई-पॉस मशिनवर लाभार्थ्यांचा अंगठा न जुळणं, मशिनमध्ये नाव न येणे, आधार लिंक नसणं, नेटवर्क समस्या अशा विविध कारणांमुळे गोरगरिब कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळं उपासमारीचं हे संकट टाळण्यासाठी अशा कारणामुळे बंद केलेला शिधा सुरळीतपणे सुरू ठेवावा अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिका-यांना दिलेल्या एका निवेदनात करण्यात आली आहे. शिधापत्रिकेच्या संगणकीकरण कालावधीत ऑफलाईन धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. शिधावाटप अधिका-यांनी शिधापत्रिका धारकांच्या नावाची चुकीच्या पध्दतीनं नोंद केल्यानं ही समस्या उद्भवल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: