शालेय प्रकल्पातून शाळकरी मुलांनी भारतातील विविध राज्यातील विविधतेचे दर्शन घडवले. शालेय शिक्षणासह बाह्य जगाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दरवर्षी विविध प्रकल्प सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. ठाणे पूर्वतील पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय प्रकल्पातून भारतातील विविध राज्यातील विविधतेचे दर्शन घडवले आहे. पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात आपले प्रकल्प सादर केले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, गुजरात अशा राज्यातील संस्कृती आणि तेथील जीवनमान हुबेहूब प्रतिकृतीतून साकारण्यात आले होते. तर काही विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील पेहराव आणि राहणीमान दर्शवण्यासाठी वेशभुषा केल्यानं या प्रदर्शनात एकप्रकारे जिवंतपणा आला होता. या उपक्रमाचं आयोजन शाळेचे मुख्य समन्वयक सतिश जाधव आणि मिसेस जोया आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं.
