शारदा विद्यामंदिर या वसतीगृह शाळेला ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात

ठाण्यातील उन्नती मंडळ संचालित शारदा विद्यामंदिर या वसतीगृह शाळेला डॉ. राजेश मढवी यांच्या ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात देण्यात आला. गेली कित्येक वर्ष तुटपुंज्या अशा आर्थिक बळावर तसंच जनसामान्यातून येणा-या मदतीवर आणि शिक्षक वर्ग स्वत: आपल्या पगाराचा काही भाग देऊन ही पाचवी ते दहावीच्या वर्गापर्यंतची शाळा मोठ्या कर्तृत्वाने संस्था चालवत आहे. यामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब तसंच काही अनाथही आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेले, शहरातील झोपडपट्टींमधून आलेले हे विद्यार्थी शैक्षणिक कला, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावत आहेत. या शाळेला रोटरी क्लब, रेडक्रॉस तसंच इतर दानशूर व्यक्तींकडून वेळोवेळी मदत केली जाते. डॉ. राजेश मढवी यांच्या गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी वैद्यकीय शिबीरं घेऊन मदत केली जाते. काल झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान या शाळेस डॉ. राजेश मढवी यांच्यातर्फे मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत घोषित करण्यात आली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: