मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले आहेत. मुंबईहून नाशिककडे जाणा-या इनोव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर ही गाडी गेल्यानं हा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.
