वाहतुकीचे नियम भंग करणा-या १६६८ रिक्षांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई

वाहतुकीचे नियम भंग करणा-या १६६८ रिक्षा चालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. कल्याणमध्ये एका रिक्षा ड्रायव्हरनं आशा गावंड या वाहतूक शाखेच्या महिला पोलीसाला फरफटत नेण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलीसांनी वाहतुकीचे नियम भंग करणा-या रिक्षा चालकांवर जोरदार कारवाई केली. आशा गावंड यांनी या रिक्षा चालकाला त्याचा चालक परवाना मागितला होता. त्यावरून झालेल्या प्रकारानंतर पोलीसांनी रिक्षा चालकांना आपला इंगा दाखवला आहे. १२ ते १६ ऑक्टोबर या दरम्यान पोलीसांनी केलेल्या या कारवाईत नियमभंग करणा-या ६६७ रिक्षा चालकांवर रिक्षात ४ प्रवासी घेणा-या ४७४ रिक्षा चालकांवर, गणवेश न घालता व्यवसाय करणा-या ५४४ रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. या कारवाई अंतर्गत रिक्षा चालकांच्या २३ रिक्षा संघटनांनाही नोटीसा देण्यात आल्या असून रिक्षा चालकांना शिस्त लावण्याच्या सूचना या संघटनांना देण्यात आल्या आहेत. रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम भंग करण्याचा प्रकार वारंवार केल्यास रिक्षाचा परवाना रद्द करण्याबरोबरच रिक्षाही जप्त करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: