वागळे इस्टेटमध्ये झालेल्या गॅस सिलेंडर गळतीत एक महिला ठार तर ९ जण जखमी

वागळे इस्टेटमध्ये झालेल्या गॅस सिलेंडर गळतीनंतर उडालेल्या भडक्यात एक महिला ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. वागळे इस्टेट रोड नंबर २२ परिसरातील इंदिरानगर येथे पडीक जागेत उभारण्यात आलेल्या नालंदा बुध्दविहाराच्या डागडुजीचं काम सुरू आहे. बुध्दविहाराच्या अधिपत्याखाली रस्त्याजवळ उभारलेले गाळे भाड्याने देण्यात आले आहेत. याच गल्लीतील एका पत्र्याच्या गाळ्यात गोमतीप्रसाद शर्मा हा जुने आणि भंगार सामानातून फर्निचर बनवण्याचं काम करतो. गळती झालेला सिलेंडर शर्मानं भंगारात विकत घेतला होता. मात्र त्याला योग्य ग्राहक मिळत नसल्यानं तो मोकळ्या जागेत पडून होता. बुध्दविहाराचं काम सुरू असल्यानं काही सामानसुमान हलवताना हा सिलेंडरही हलवला गेल्यानं त्यातून गळती झाली असावी अशी पोलीसांनी शक्यता वर्तवली. शर्मा हा पत्नी आणि मुलांसमवेत याच गाळ्यात वास्तव्य करतो. बुध्दविहाराकडे जाणा-या वाटेवर लोखंडी गेट उभारण्यात आलं आहे. या गेटजवळ गेल्या दोन वर्षापासून बेवारास स्थितीत पडलेल्या सिलेंडरमधून गॅस गळती होऊन भडका उडाला. आगीचे लोळ सर्वत्र पसरल्यानं शर्मा कुटुंबातील चौघांसह बुध्द विहाराच्या दारात उभ्या असलेल्या नागरिकांनीही त्याची झळ बसली. यामध्ये कमलावती शर्मा, गोमतीप्रसाद शर्मा या दांम्पत्यासह नारायण हा शिवा ही त्यांची दोन मुलंही होरपळली. यापैकी कमलावती यांचा काल मृत्यू झाला तर गोमतीप्रसाद यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीसांनी मृत्यूशी झुंजत असलेल्या गोमतीप्रसाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: