वन विभागानं उंबर्ली परिसरात जवळपास पावणे चारशे बांधकामं केली जमिनदोस्त

वन विभागानं उंबर्ली परिसरात काल धडक कारवाई करत जवळपास पावणे चारशे बांधकामं जमिनदोस्त केली. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बलयाणी मौजे उंबर्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या २८-ए या संरक्षित जागेवर अतिक्रमण करून ही बांधकामं करण्यात आली होती. दोन दिवसापासून शीळफाट्याजवळील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणं, शेडस् कोणत्याही विरोधाला न जुमानता जमिनदोस्त करण्यात आली. या कारवाईत पोलीस फौजफाटा तसंच १०० हून अधिक वन विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईत चाळी, दुकानं, शेडस् यांचा समावेश होता. या कारवाईमुळे वन विभागाची ३ हेक्टर जागा अतिक्रमण मुक्त झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading