लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदानकेंद्रा पर्यंत ने-आण करण्याची सुविधा

लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदानकेंद्रा पर्यंत ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यामध्ये सध्या 3883 एवढे दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांना मागणी केल्यास अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या मतदान केंद्रात दिव्यांग मतदार आहेत अशा ठिकाणी रॅम्प तसेच लिफ्टची सुविधा पुरवण्यात आली आहे, जे दिव्यांग मतदार मतदार मतदार मतदान केंद्रापर्यंत चालत जाऊ शकणार नाही अशांसाठी व्हिल चेअर्सही उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading