रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी काही काळ कोलमडली

रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी काही काळ कोलमडली होती. ऐन कामावर जाण्याच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. शहाड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास पाऊण ताण उशीरानं धावत होती. शहाड रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे येणा-या मार्गावर हा तडा गेला होता. या बिघाडामुळं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून गेलं होतं. अर्ध्या तासात हा बिघाड दुरूस्त करण्यात आला. मात्र बिघाड झाल्यानंतरही रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावलेला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading