राष्ट्रीय सूर्य नमस्कार दिनानिमित्त कल्याणमध्ये आज १० हजार १२० विद्यार्थ्यांनी घातले सूर्य नमस्कार

राष्ट्रीय सूर्य नमस्कार दिनानिमित्त कल्याणमध्ये आज १० हजार १२० विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार घातले. कल्याण-डोंबिवली महापालिका, माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना आणि सुभेदार कट्ट्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याणमधील सुभाष मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महापालिका क्षेत्रातील शाळांमधील १० हजार १२० विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्य नमस्कार घालून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला.

Leave a Comment

%d bloggers like this: