सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय याँगमुडो स्पर्धेत ठाणे जिल्हा संघास घवघवीत यश मिळालं आहे. या स्पर्धेत राज्यातील साडेतीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. ट्रॅडीशनल स्पोर्टस् ॲकॅडमीच्या १५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, ४ विद्यार्थ्यांनी रौप्य पदक तर ६ विद्यार्थ्यांनी कांस्य पदक मिळवलं. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील काशिद यांनी मार्गदर्शन केलं.
