मेट्रो ४ ही भूमिगत करण्याची ठाणेकरांची मागणी

ठाणेकरांनी मेट्रो ४ ही भूमिगत करावी अशी मागणी केली आहे. म्यूस आणि ठाणे नागरी प्रतिष्ठान यांनी नागरिकांच्या केलेल्या पाहणीत ७९ टक्के नागरिकांनी कासारवडवली ते मुंबई ही मेट्रो ४ भूमिगत करायला कौल दिला आहे. मेट्रो ४ च्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा, प्रदूषण, जनसुनवाई घेण्याबाबत संदिग्धता आणि रस्त्यावरून जाणारी मेट्रो याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या असून हे कसे स्मार्ट नियोजन असा प्रश्न त्यांच्या मनात उभा ठाकला आहे. हजारो ठाणेकरांच्या हरकतीकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासनाला ठाणेकरांनी मेट्रो हवी पण ती भूमीगत करावी अशी मागणी करून चपराक दिली आहे. मेट्रो विषयावर ठाणेकरांची मतं जाणून घेण्यासाठी म्यूस आणि ठाणे नागरी प्रतिष्ठानच्या वतीनं १ हजाराहून अधिक ठाणेकरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात मेट्रो ४ च्या उभारणीबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले होते. ठाणेकरांनी दिलेल्या उत्तरातून ठाणेकर मेट्रो ४ च्या उभारणीबाबत समाधानी नसल्याचंच यातून समोर आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: