मूकबधीर प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षणार्थींसाठी नवीन इमारत बांधली जाणार

उल्हासनगर येथील शासकीय प्रौढ, मूकबधीर प्रशिक्षण केंद्राची जुनी इमारत पाडून मूकबधीर, अपंगांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत दिली. उल्हासनगरमधील शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्र १९६७ मध्ये उभारण्यात आलं. या प्रशिक्षण केंद्राची पडझड झाली होती. या इमारतीच्या दुरूस्तीचा प्रस्ताव १४ वर्षापूर्वी समाज कल्याण आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. पण त्याला मंजुरी मिळाली नव्हती. या केंद्राच्या दुरूस्तीबाबत काही कार्यवाही करण्यात आली आहे का असा तारांकीत प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी जुनी इमारत पाडून प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल. त्यासाठी ३० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहितीही राजकुमार बडोले यांनी दिली.

Leave a Comment

%d bloggers like this: