जिल्ह्यातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेतीबंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षीरसागर या अंगणवाडी सेविकेची राष्ट्रीय अंगणवाडी सेवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांची अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांची उत्तम अंमलबजावणी करणा-या देशातील विविध राज्यातील अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली जाते. राज्यातून ५ अंगणवाडी सेविकांची यासाठी निवड झाली असून यातील एक अंगणवाडी सेविका या जिल्ह्यातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेतीबंदर अंगणवाडी सेविका स्नेहा क्षीरसागर आहेत. येत्या सोमवारी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.
