मुंब्रा येथे सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटा मुळे गुढ – ३ व्यक्ति जखमी

मुंब्रा येथे आज सकाळी झालेल्या एका मोठ्या स्फोटा मुळे गुढ निर्माण झाला आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास मुंब्रा मधील मुघल पार्क या इमारतीत हा मोठा झाला. ही इमारत तळ अधिक चार मजली असून या इमारतीमध्ये 25 फ्लॅट आहेत. तळमजल्यावरील एका भंगारच्या दुकानांमध्ये गॅस सिलेंडर मध्ये लिकेज झाल्याने भडका उडाल्याच सांगितलं जात, मात्र या स्फोटाची व्याप्ती फार मोठी होती. याच स्फोटाचा आवाज अगदी दूरपर्यंत ऐकू आला. या स्फोटामध्ये फारशी हानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ झालं आहे.  या स्फोटात ३ व्यक्ति जखमी झाल्या आहेत. या इमारतीसमोरील एका गाडीचं झालेलं नुकसान या स्फोटाची तीव्रता सांगून जाते. या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव इतरत्र हलवण्यात आल आहे. या इमारतीमध्ये एकूण 76 रहिवासी राहत होते. त्यांची तात्पुरत्या स्वरूपात शिमला पार्क या शाळेत करण्यात आली आहे. या इमारतीतील झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी धाव घेतली असून बॉम्ब शोध नाशक पथकातर्फे ही इमारतीची पाहणी करण्यात आली. हा स्फोट या सिलेंडर लिकेजमुळे झाला असल्याचा सांगितलं जात असलं तरी याबाबत एक मोठं गुढ निर्माण झाल आहे. या स्फोटानंतर मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि तीव्र संताप व्यक्त केला. हा स्फोट  सिलेंडर लिकेजचा  नसण्याची शंका त्यांनी व्यक्त केली.  आव्हाड यांनी पालिका आणि पोलिसांच्या एकुणच कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading