महावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता प्रति बीलावर १० रूपये सवलत देणार

महावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता प्रति बीलावर १० रूपये सवलत देणार आहे. कागद विरहित कारभार आणि ऑनलाईन वीज भरण्याला प्रोत्साहन देण्याकरिता महावितरणनं विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जे वीज ग्राहक छापील बीलाऐवजी ई-मेल आणि एसएमएसचा पर्याय स्वीकारतील अशा ग्राहकांना येत्या १ डिसेंबरपासून प्रति देयकावर १० रूपये सवलत दिली जाणार आहे. महावितरणच्या ग्राहकांना वीज बीलाची माहिती आणि वीज बील भरण्यासाठी मोबाईल ॲप आणि संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. सध्या महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीज बीलही दिलं जातं. पण जे ग्राहक गो ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात अशा ग्राहकांना छापील बीलाऐवजी ई-मेल आणि एसएमएस द्वारे बील पाठवले जाते अशा ग्राहकांना १० रूपये सवलत दिली जाणार आहे. यासाठी वीज ग्राहकांना महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. गो ग्रीनचा पर्याय निवडणा-या ग्राहकांना ही सवलत तातडीनं उपलब्ध करून दिली जाणार आहे. गो ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असून ग्राहकांनी या सुविधेचा वापर करावा असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष संजीवकुमार यांनी केलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading