महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धच शिवाजी मैदानावर आयोजन

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी मैदानावर महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झाले. ठाण्यात महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धा ही पहिल्यांदा होत असून, ह्या स्पर्धेसाठी मुंबई सिटी, मुंबई डिस्ट्रिक्ट, पालघर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून एलिट वयोगटातील मुला-मुलींचा मोठ्या संख्येने सहभागी नोंद झाली आहे. आज सर्व वयोगटातील मुलामुलींची अंतिम फेरीची सुरूवात होणार आहे. त्यामुळे ठाणे, मुंबई सिटी, मुंबई डिस्ट्रिक्ट, मुंबई उपनगर, पालघर ह्यांची चुरशीची ठाणेकरांना पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे महापौर चषक कोणत्या जिल्ह्याच्या किंवा कोणत्या सिटीच्या संघाकडे जाणार ह्याकडे सर्वांचेच लक्ष असून बॉक्सर्स आणि कोचेस हयासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: