मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं ८ ते १० मार्च दरम्यान न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ज्येष्ठ तज्ञांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे. ही माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष दा. कृ. सोमण यांनी दिली. शुक्रवार ८ मार्च रोजी आरोग्यम् धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोगतज्ञ डॉ. राजीव कर्णिक, कर्करोगतज्ञ डॉ. अनिल हेरूर आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. उल्का नातू सहभागी होणार आहेत. शनिवार ९ मार्च रोजी सायबर सुरक्षा आणि गुन्हे या विषयावर ॲडव्होकेट प्रशांत माळी बोलणार आहेत. तर रविवार १० मार्च रोजी भावनिक बुध्दीमत्ता आणि पालकत्व या विषयावर डॉ. संदीप केळकर श्रोत्यांशी संवाद साधतील असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
