मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या २ हजार ७१ वाहन चालकांवर पोलीसांची कारवाई

मद्य पिऊन वाहन चालवणा-यांच्या विरोधात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीसांनी केलेल्या कारवाईत २ हजार ७१ तळीरामांवर कारवाई करण्यात आली असून ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागता दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी जय्यत तयारी केली होती. शहर आणि ग्रामीण पोलीसांनी साडेसहा हजार पोलीसांचा फौजफाटा तैनात केला होता. साडेचारशे वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी, अपघात आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांवर देखरेख करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून पोलीसांतर्फे याबाबत जनजागृतीही केली जात आहे. पण तरीही मद्यप्राशन करून वाहन चालक वाहनं चालवतच आहेत. यावेळी अशा तळीरामांना आवर बसावा म्हणून २२ श्वास विश्लेषकांसह ५० प्रमुख नाक्यांवर २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांवर कारवाई केली. या कारवाईत २ हजार ७१ तळीरामांना पकडण्यात आलं.

Leave a Comment

%d bloggers like this: