भिवंडी दंगलीतील पोलिसांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला 13 वर्षांनी गजाआड करण्यात पोलिसांना यश

भिवंडीत झालेल्या दंगली दरम्यान दोन पोलिसांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला 13 वर्षांनी गजाआड करण्यात भिवंडी पोलिसांना यश आल आहे. 2006 मध्ये भिवंडीत कॉटर गेट येथील जागेवर पोलीस ठाणे बांधण्यावरून दंगल झाली होती. या दंगलीमध्ये दोन पोलिसांची हत्या करण्यात आली होती. पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामास विरोध करण्यात आला होता. त्यावेळी जमावाने दगडफेक करून दंगल घडवली होती. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोन पोलिसांची हत्या केली.पोलिसांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरां ला पोलिसांची गोळी लागली होती. या दंगलीत तत्कालीन पोलीस उपायुक्त सह 39 पोलीस जखमी झाले होते.पोलिसांनी या प्रकरणी चारशे जणांवर गुन्हे दाखल केले होते. पोलिसांच्या हातातील मोहम्मद मोहिद्दिन हा गोळी लागल्यानंतर फरार झाला होता. तो भिवंडीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून मोहम्मदला भिवंडीतून ताब्यात घेतल.

Leave a Comment

%d bloggers like this: