भिवंडीतील शेतक-यांनी बुलेट ट्रेनसाठी जमीन मोजणीस हिरवा कंदिल दाखवल्याने ६१ हेक्टर जमिनीची मोजणी सुरू होणार

भिवंडीतील काही शेतक-यांनी बुलेट ट्रेनसाठी जमीन मोजणीस हिरवा कंदिल दाखवला असून यामुळे ६१ हेक्टर जमिनीची मोजणी सुरू होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासंदर्भात जिल्हा प्रशासनाची शेतक-यांशी चर्चा सुरू आहे. काल भिवंडी प्रांत कार्यालयात शेतक-यांशी झालेल्या चर्चेत शेतक-यांनी संयुक्त जमीन मोजणीस होकार दर्शवला आहे. या होकारामुळे भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर जमिनीची मोजणी होण्याचा मार्ग सुकर झाला असून १३१ खातेदार या ठिकाणी आहेत. शेतक-यांनी काही अटी कायम ठेवून संयुक्त जमीन मोजणीस होकार दिल्यानं १७ ते १९ जानेवारी दरम्यान अंजूर, भरोडी, हायवे दिवे येथील शेतक-यांच्या जमिनीची मोजणी केली जाणार आहे. शेत जमीन बाधित शेतक-यांना मोबदला ठरवण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीमध्ये प्रतिनिधीत्व द्यावं, बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेल्या सर्व्हीस रोडला भरोडी ते म्हातार्डी जोडणारा सर्व्हीस पूल द्यावा, सुरई, भरोडी आणि अंजूर या भागातील प्रस्तावित कारशेडमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना त्यांच्या कौशल्यावर आधारीत नोकरी द्यावी, यासाठी अप्रशिक्षित मुलांना प्रशिक्षित करून त्यांना प्राधान्यानं सामावून घ्यावे अशा काही मागण्या यावेळी शेतक-यांकडून करण्यात आल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: