बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात ८७.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीच्या आज जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यामध्ये ८७.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १ लाख १ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८९ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेस ५३ हजार ८०२ मुलं बसली होती. त्यापैकी ४५ हजार ७७१ मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर ४८ हजार १२४ मुलींनी ही परीक्षा दिली त्यापैकी ४३ हजार ७१४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण होणा-यांमध्ये मुलांची टक्केवारी ८५.०७ टक्के आहे. तर मुलींची टक्केवारी ९०.२१ टक्के आहे. विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी ३१ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणा-यांची टक्केवारी ही ९२.९३ टक्के आहे. कला शाखेतून १५ हजार २४५ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली त्यापैकी ११ हजार ९७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून उत्तीर्ण होणा-यांची टक्केवारी ही ७८.५५ टक्के आहे. वाणिज्य शाखेतून एकूण ४८ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ४३ हजार ४१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून उत्तीर्ण होणा-यांची टक्केवारी ही ८९.२४ टक्के आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading