बदलापूरमधील प्लॅटीनम पॉलिमर या रासायनिक कंपनीला आज भीषण आग लागली होती. मात्र या आगीतही कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं. सकाळच्या सुमारास या रासायनिक कंपनीत आग लागल्यानंतर रसायनाच्या पिंपाचेही स्फोट झाले. यामुळे आगीचा भडका उडाला. आग विझवण्यासाठी बदलापूर औद्योगिक वसाहतीचं अग्निशमन दल, बदलापूर, अंबरनाथ परिषदेच्या अग्निशमन दलाची वाहनं तसंच ठाणे महापालिकेची अग्निशमन दलाची वाहनं आग विझवण्याचं काम करत असून दुपारच्या सुमारास या आगीवर ५० टक्के नियंत्रण मिळवण्यात या अग्निशमन दलांना यश आलं. बदलापूर अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Image-2019-01-04-at-4.41.00-PM.jpeg)