प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

सध्या रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असून प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं दिला आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्यांविषयी माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतं संस्थेनं हा इशारा दिला. रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे अनेक अपघात होत आहेत. पण रेल्वे प्रशासन हे अपघात रोखण्याकडे दुर्लक्ष करत आहे. रेल्वे प्रवासात महिलांना तर प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं महिला विशेष लोकल सुरू करावी, १५ डब्यांच्या गाड्या वाढवाव्या, अपघातग्रस्तांना वेळीच मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे, पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं काम तात्काळ पूर्ण करावं, प्रवाशांना उत्तम सुविधा द्याव्या, रेल्वेची रूग्णालयं वाढवावी अशा प्रवाशांच्या हिताच्या मागण्या महासंघानं रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. रेल्वेचे महाव्यवस्थापक भेट देत नसल्यामुळं प्रवाशांच्या समस्या सुटत नाहीत यामुळं या समस्या तात्काळ न सुटल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवासी महासंघानं दिला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: