प्रत्येकाने कॉलेजमधे कर्तुत्व गाजवणे पुढील आयुष्यात फार महत्वाचे – अरुण नलावडे

ज्या महाविद्यालयात आपण शिकलो त्या कॉलेजमधे आपल्याला सन्मानाने बोलावणे ही गोष्ट अतिशय सन्मानकारक असून प्रत्येकाने कॉलेजमधे कर्तुत्व गाजवणे पुढील आयुष्यात फार महत्वाचे ठरते .त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत ” असा आशावाद सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केला. जोशी-बेडेकर महाविद्यालय ठाणे च्या सुवर्ण वर्षा निमित्त एक सांस्कृतिक सोहळा सर्ज-माजी विद्यार्थी संघटना आणि जोशी-बेडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात
प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .विद्या प्रसारक मंडळ ठाणेचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर यांनी उपस्थित आजी-माजी विद्यार्थींशी संवाद साधला, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, सर्ज-माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा माधवी नाईक यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थी आणी शिक्षक यांचे नाते‌ दृढ होत गेले ह्या वर प्रकाश टाकला.सांस्कृतिक सोहळ्यासाठी ७५०च्या वरती प्रेक्षकांनी उपस्थिती लावली त्यातील ३५० हे माजी विद्यार्थी होते आणि उर्वरित महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग होते. कार्यक्रमात ज्या कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले तेही महाविद्यालयाचे माजी विद्यार्थीच होते.डॉ.मृदुला दाढे-जोशी, पल्लवी लेले, स्वाती सुर्वे, अपर्णा बेडेकर, शशांक मोहिते, निधी प्रभू, ऋषिकेश पाटील, डॉ. मानसी गोरे,प्रीती निमकर अशा अनेक कलावंतांनी आपली कला सादर केली.
या सोहळ्यात महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत झालेले बदल दर्शवणारी एक चित्रफित दाखवण्यात आली. या चित्रफितीत निवृत्त प्राचार्य डॉ. मूळगावकर, डॉ.शकुंतला सिंग आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर यांची मुलाखात दाखवण्यात आली. जस जशी संध्याकाळ वाढत होती तस तशी कार्यक्रमाची रंगत देखील चढत होती. कार्यक्रम चार विभागात विभागलेला होता गुरु, मैत्री, विरह आणि प्रेम.कार्यक्रमात मुकुल कोळी आणि रोहिणी कोळी , स्वप्नील मयेकर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थिनीनी कोळी नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे दुसरे आकर्षण म्हणजे सेल्फी पॉइंट, स्वाक्षरी फलक, महाविद्यालयाच्या जुन्या फोटोंचे प्रदर्शन, त्वरित फोटो आणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले इंस्टॉलेशन्स या सोहळ्याचे वैशिष्ठ होती. या सांस्कृतीक सोहळ्याची सांगता मिले सुर मेरा तुम्हारा या गाण्याने झाली.

Leave a Comment

%d bloggers like this: