पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन मतदार नोंदणी शिबीर

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत आणि सेवा निवृत्त जवान, अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याकरिता “माझी वर्दी, माझा मताधिकार” या अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तहसिलदार आसावरी संसारे, नायब तहसिलदार स्मितल यादव, नायब तहसिलदार नीलिमा मोहिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि आगामी निवडणूकीमध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन केले. तसेच यावेळी उपस्थिताच्या शंकांचेही निरसन करण्यात आले. या शिबिरामध्ये ठाणे जिल्ह्यातील पोलिसांचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अर्ज BLO चंद्रिका पालन यांनी Voter Helpline App वर भरून देण्यास सहकार्य केले. या शिबिरामध्ये सुमारे १४० पोलिसांनी सहभाग घेतल्याची माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.

 

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading