पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन ११ दिवस लवकर

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गणेश भक्तांची हाक गणरायानं ऐकली असून पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन हे ११ दिवस आधी होणार आहे. पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी ही माहिती दिली. पुढच्या वर्षी २ सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. यंदा हे आगमन १३ सप्टेंबरला झालं होतं. त्यामुळं पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन हे ११ दिवस लवकर होणार आहे. दा. कृ. सोमण यांनी पुढील १० वर्षाच्या गणरायाच्या आगमनाचे दिवस दिले आहेत. २०२० मध्ये शनिवार २२ ऑगस्टला, २०२१ मध्ये शुक्रवार १० सप्टेंबरला, २०२२ मध्ये बुधवार ३१ ऑगस्टला, २०२३ मध्ये मंगळवार १९ सप्टेंबरला, २०२४ मध्ये शनिवार ७ सप्टेंबरला, २०२५ मध्ये बुधवार २७ ऑगस्टला, २०२६ मध्ये सोमवार १४ सप्टेंबरला तर २०२८ मध्ये बुधवार २३ ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: