पिवळ्या-केशरी झेंडूच्या फुलांनी बाजार सजला

विजयादशमी अर्थात दसरा उद्या असून दसरा आणि झेंडूच्या फुलांचं एक वेगळंच समीकरण आहे. यंदा झेंडूच्या फुलांची आवक मुबलक असून फुलांचे भाव काहीसे स्थिर असल्याचं दिसत आहे. शस्त्र, यंत्र आणि सरस्वतीची पूजा करण्यासाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. विविध ठिकाणच्या फूल बाजारातही पिवळ्या-केशरी रंगाच्या झेंडूची खरेदी करण्यासाठी नागरिकांची आज गर्दी होत आहे. रस्त्यारस्त्यांवर झेंडूच्या फुलांच्या गाड्या दिसत आहेत. ठाणे, कल्याण येथील फुलबाजारात हजारो किलो झेंडूच्या फुलांची आवक होते. झेंडूच्या फुलांची किंमत ठोक बाजारात ६० रूपये तर किरकोळ बाजारात ८० रूपये आहे. ठाण्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी फुले विकण्यासाठी शहरात येतात. आपट्याची जुडी १० रूपये, मोग-याचा गजरा १० रूपये तर शेवंतीच्या वेणीसाठी २५ रूपये मोजावे लागत आहेत. झेंडूच्या हारांनाही विशेष मागणी असून २ फूटाच्या हारासाठी साधारणत: ५० रूपये तर ४ फूटाच्या हारासाठी १०० ते सव्वाशे रूपये मोजावे लागत आहेत. तर छोट्या हाराला ४० रूपये मोजावे लागत आहेत. कुठल्याही कामाची सुरूवात करताना शुभ समजल्या जाणा-या आंब्याच्या डहाळीचा भाव १० रूपयांवर आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: